कोल्हार प्रतिनिधी- (साईप्रसाद कुंभकर्ण /गणेश कुंभकर्ण)
दोन महिण्यानंतर अ.नगर जिल्ह्यातील ताळेबंदी उघडली असली तरी व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करत आहे कि नाही हे पाहण्यासाठी आज अ.नगर चे जिल्ह्याधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी कोल्हारमधील बाजारपेठे मध्ये अचानक भेट दिली
जिल्हाधिकार्यांनी अचानक घेतलेल्या आढाव्यात दुकानांमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांची पायामल्ली होत असल्याचे दिसुन आल्यावर जिल्हाधिकार्यांनी तीन दुकाने पुढील आदेश येईपर्यंत सील केली .ही दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन करोना स्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी शिर्डीकडे जात असताना अचानक कोल्हार भगवतीपूरमध्ये भेट दिली असता त्यांनी थेट स्व. माधवराव खर्डे पा. चौकातील बाजारपेठेत चक्कर मारली व, येथील काही दुकानांमध्ये असलेली गर्दी , विनामास्क खरेदी करणारे ग्राहक, सोशल डिस्टन्ससिंगचा उडालेला फज्जा हे सर्व चित्र त्यांनी प्रत्यक्ष पहिले. व त्यांनी तत्काळ येथील तीन दुकान चालकांवर कारवाईचा बडगा उचलत ही दुकाने सील करण्यात आली.
व्यवसायिकांनी सोशल डिस्टन्ससिंग ठेवून विनामास्क येणाऱ्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देऊ नये. तसेच ग्राहक आणि दुकान मालकात ४ फुटाचे अंतर ठेवून व्यवसाय करावा अशा सूचना त्यांनी व्यावसायिकांना दिल्या. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. अन्यथा त्या दुकान चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.व ग्रामविकास अधिकार्यांना विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनिल पोखरणा,कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.घोलप, कोल्हार बु. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे आदि उपस्थित होते.
Post a Comment